Selection for Nationals from Maharashtra for Freestyle Relay | फ्रीस्टाईल रिलेसाठी महाराष्ट्रातील नागरिकांची निवड

om-satam-with-certificates

ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून आपली ओळख निर्माण केलेला सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयश्री प्राप्त करणारा हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला. नुकतेच त्याचे फ्री स्टाईल रीले साठी महाराष्ट्रातून नॅशनल साठी सिलेक्शन.. तसेच ४०० फ्री स्टाईल साठी महाराष्ट्रातून दुसरा आणि ८०० फ्री स्टाईल साठी तीसरा आहे. त्याने आता…

Read More | पुढे वाचा

Inauguration of health camp by police son Om Satam | पोलीस पुत्र ओम साटमच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन

om-satam-inaugration-event

आपल्या सर्व पोलीस परिवारातील कुटुंबीयांना कळविण्यात आनंद होत आहे की, उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२३, रविवार रोजी आपण आयोजित केलेल्या आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन हे आपला पोलीस पुत्र ओम साटम व त्याचे पालक यांच्या हस्ते होणार आहे आणि ही आपल्या पोलीस परिवारासाठी खरच खूप कौतुकाची व गौरवास्पद गोष्ट आहे की १६ वर्षाचा हा आपला पोलीस पुत्र ओम साटम आज त्याच्या स्विमिंगच्या क्षेत्रात गगन भरारी घेत आहे, आणि त्या निमित्तानेच एवढ्या कमी वयात त्याने आपल्या या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून उद्घाटन करण्याचे आपले आमंत्रण स्वीकारले देखील आहे… तरी…

Read More | पुढे वाचा

Congratulation for getting bronze medal in All India Police Badminton Tournament | अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक मिळाल्या बद्दल सत्कार

raju-rane-awarded-2023

आपल्या जानवली गावचे सुपुत्र राजेंद्र शंकर राणे हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून आज त्यांच्या सुप्त गुणांची एक नवीन ओळख मिळाली ती त्यांना मिळालेल्या पदकामुळे पोलिस दलात काम करत असताना अनेक समस्यांना तोंड देत आपले आवडीचे खेळ अथवा कला क्रीडा गुण जपणं तस जिकिरीचं असत. कित्येक वेळा आवड असतानाही सराव करणं देखील वेळेच्या अभावा मुळे शक्य होत नाही परंतु राजेंद्र शंकर राणे यांनी ते शक्य केलं आणि त्याच फळ त्यांना मिळालं. पोलिस कमिशनर श्री.रजनीश शेठ ह्यांच्याकडून राजेंद्र शंकर राणे जानवली (गावठणवाडी) यांना चंदीगड येथे अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य…

Read More | पुढे वाचा

Swimming / जलतरण

Om Satam Janwali, Gavthanwadi

ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून उदयास आलेला हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून भल्या पहाटे उठून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या वडिलांची जबाबदारी त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला. जलतरण अथवा पोहणे हा त्याचा आवडीचा विषय आणि त्यामुळेच त्याच्या पालकांनी देखील त्याला प्रोत्साहन देऊन त्याला सहकार्य केले त्याच्या प्रचंड मेहनत घेऊन त्याला या स्पर्धंत्मक युगात स्वतःचे पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि देव लिंगेश्वर…

Read More | पुढे वाचा

Pro Kabaddi / प्रो कबड्डी

Pranay Rane - Janavali, Sakhalwadi

प्रणय राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक होतकरू खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने विवो प्रो कबड्डी सारख्या कबड्डी खेळामध्ये प्रवेश मिळविला सध्या तो यू मुंबा या टीम साठी खेळत असून दिवसागणिक त्याची प्रगती उत्तमरीत्या प्रगती पथावर आहे. प्रणय राणे याने या खेळात आपला जम बसविला असून अनेक मोठं मोठया नामांकित खेळाडूंसोबत त्याची टक्कर पाहताना जानवली गावाचे नाव दिमाखात डोलताना दिसल्याची अनुभूती येते. प्रणयचा हा प्रवास खडतर असला तरी त्याची जिद्द आणि चिकाटी नक्कीच त्याला तारून नेईलच. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तसेच स्वतःला टिकून ठेवण्यासाठी…

Read More | पुढे वाचा

Kabaddi / कबड्डी

Gaurav Rane Mukkam Post Janwali Sakal Wadi

गौरव राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक मेहनती खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने कबड्डी सारख्या खेळामध्ये प्रवेश मिळविला सध्या तो आतंरराष्ट्रीय टीम साठी खेळला असून दिवसागणिक त्याची प्रगती उत्तमरीत्या प्रगती पथावर आहे. गौरव राणे याने या खेळात आपला चांगलाच जम बसविला असून अनेक मोठं मोठया नामांकित खेळाडूंसोबत त्याचा खेळ पाहताना जानवली गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात डोलताना दिसल्याचे दिसून येते. गौरवचा हा प्रवास कष्टदायी असला तरी त्याची जिद्द आणि चिकाटी नक्कीच त्याला आयुष्यात अनेक संधी उपलब्ध करून देईल. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्वतःला टिकवण्या साठी तसेच स्वतःला…

Read More | पुढे वाचा