Pro Kabaddi / प्रो कबड्डी

Pranay Rane - Janavali, Sakhalwadi

प्रणय राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक होतकरू खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने विवो प्रो कबड्डी सारख्या कबड्डी खेळामध्ये प्रवेश मिळविला सध्या तो यू मुंबा या टीम साठी खेळत असून दिवसागणिक त्याची प्रगती उत्तमरीत्या प्रगती पथावर आहे.

प्रणय राणे याने या खेळात आपला जम बसविला असून अनेक मोठं मोठया नामांकित खेळाडूंसोबत त्याची टक्कर पाहताना जानवली गावाचे नाव दिमाखात डोलताना दिसल्याची अनुभूती येते.

प्रणयचा हा प्रवास खडतर असला तरी त्याची जिद्द आणि चिकाटी नक्कीच त्याला तारून नेईलच. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तसेच स्वतःला टिकून ठेवण्यासाठी फारच प्रयत्नशील तसेच फिट रहावे लागते आणि त्याच्या खेळावरून ते प्रत्यक्षात दिसूनही येते.

प्रणय राणेंच्या या कर्तृत्वाचा आपल्या गावातील तरुण पिढीने आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या आवडी नुसार कोणत्याही क्षेत्रात अथक परिश्रम करून आपणास सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आई वडिलांसोबत आपल्या कुळाचे आपल्या गावाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करावा देव लिंगेश्वर पावनाईचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत.

आपणा सर्वांकडून प्रणय राणेला खूप खूप शुभेच्छा त्याने असेच पुढील आयुष्यात उत्तमोत्तम कामगिरी करून अनेक स्पर्धांमध्ये चांगला विजय प्राप्त करून जास्तीत जास्त पारितोषिके मिळवून त्याचा प्रवास सुखकर व्हावा हीच मनीषा व्यक्त करून त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन त्याच्या खेळाचे प्रक्षेपण दूरदर्शनच्या स्टार स्पोर्ट्स चॅनेल वर आपण पाहावे तसेच अधिक माहिती साठी आपने खालील संकेत स्थळावर सुद्धा भेट देऊ शकता

अधिक माहितीसाठी पहा – वीवो प्रो कबड्डी : https://www.prokabaddi.com/players/pranay-rane-profile-5117

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments