राज्य शालेय जलतरण स्पर्धा – ५ ते ८ नोव्हेंबर २०२४, बालेवाडी, पुणे | State School Swimming Competition – 5th to 8th November 2024, Balewadi, Pune

om-satam-gold-medal-winner

आमच्या सर्वांच्या अभिनंदनाचा पात्र ठरलेला ओम प्रवीण साटम याने राज्य शालेय जलतरण स्पर्धेत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे! १७ वर्षाखालील मुलांच्या गटात त्याने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३ सुवर्णपदके जिंकली आहेत. ओमने २०० मीटर फ्री स्टाईल, ४०० मीटर फ्री स्टाईल आणि ८०० मीटर फ्री स्टाईल या तीन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

त्याच्या यशामुळे ओमची महाराष्ट्राच्या रिले संघात निवड झाली आहे आणि आता तो पुढील पायरीवर राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. हि आपल्या जाणवली गावासाठी देखिल अभिमानाची बाब आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्याच्यावर सर्वांचा अभिमान असून त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा!

ओमच्या अथक परिश्रम आणि निश्चयामुळे त्याचे यश प्रेरणादायी ठरले आहे. त्याने आपली मेहनत, चिकाटी, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे स्वप्न साकार केले आहे. भविष्यातील वाटचालीसाठी ओमला आमच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्या यशाने अनेक नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि राज्याला जलतरण क्षेत्रात नवे यश मिळवून देण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. 🏆🏆

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Mahesh

Congratulations!