ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून उदयास आलेला हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून भल्या पहाटे उठून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या वडिलांची जबाबदारी त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला.
जलतरण अथवा पोहणे हा त्याचा आवडीचा विषय आणि त्यामुळेच त्याच्या पालकांनी देखील त्याला प्रोत्साहन देऊन त्याला सहकार्य केले त्याच्या प्रचंड मेहनत घेऊन त्याला या स्पर्धंत्मक युगात स्वतःचे पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि देव लिंगेश्वर पाव्हनाईच्या आशीर्वादाने त्याला अपेक्षित यश देखील मिळत गेले.
ओम साटम च्या या यशाने प्रेरित होऊन आपल्या गावातील इतर मुलामुलींनीही अशा प्रकारे विविध खेळात सहभाग घेऊन आपल्या मधील सुप्त कलागुणांना वाव द्यावा प्रत्येक मुलांच्या आई वडिलांनी मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना प्राधान्य द्यावे जेणे करून ते आपले इप्सित साध्य करू शकतात.
ओमच्या पुढील वाटचाली करिता आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन त्याने असेच याही पुढे अपार कष्ट करून जिद्दीने सर्व समस्यांवर मात करून स्वतःचे, आपल्या आई वडिलांचे, कुळाचे तसेच आपल्या गावाचे नाव उज्वल करावे.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धे मध्ये मुंबई च्या ओम प्रविण साटम याचे ब्राँझ पदक दि. २/१/२०२३ ते १२/१/ २०२३ या कालावधीमध्ये पुणे येथील बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक २०२३ स्पर्धेमध्ये जानवली/मुंबई च्या ओम प्रविण साटम या खेळाडूने जलतरण या खेळामध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ब्राँझ पदक पटकावले. त्याने १५०० मी. फ्री स्टाईल स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. सदर क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते. ओम प्रविण साटम हा राज्य आणि राष्ट्रीय जलतरण खेळाडू आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिंनदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…