जानवली गावातील गावठण वाडीतील माननीय कै. भिमराव राणे यांचे सुपुत्र आज दिनांक ४ मे २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांच्या बद्दल दोन शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली. सन्माननीय नारायण राणे यांच्या बद्दल बोलणे एका लेखात अगदीच अशक्य कारण त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या सोबत बरेच महिने सहवास लाभल्यावर त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास प्रचंड प्रमाणात अगदी एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आणि त्याबद्दल त्याविषयावर त्यांची असलेली पकड खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम अभियांत्रिकीमधील प्रमाणित पदवीधर आणि रँकधारक, त्यांनी १९८० च्या दशकात डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण करून त्यांनी आपल्या यशात आणखी एक…
Read More | पुढे वाचाTag: At Post Janavali
Lost the tune | सूर हरपला…
सूर हरपला… १५ जुलै १९३२ साली जानवली गावठणवाडी येथे एक सूर जन्माला आला अर्थात सोनू – काशिबाई याना पुत्ररत्न प्राप्त झाले श्री लिगेश्वर पावणाईचे आशीर्वाद आणि देवी सरस्वतीचे कृपाशिर्वाद असलेल्या या नामदेव साटम (सहदेव सोनू साटम) यांच्या जीवनाचा प्रवास सुरु झाला. वडील मुंबई स्थित गवाळीया टॅंक विभागात मेताजी (मुनीमजी) म्हणून कार्यरत होते. परंतु एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आई काशिबाई सोबत व काका, काकी परिवारा सोबत वडिलोपार्जित शेती करत शालेय शिक्षणाची सुरवात झाली. अगदी लहान वयातच वडिलांच्या दुःखद निधनाने वडिलांचे छत्र हरपले आणि सुरु झाला आयष्याचा संघर्ष. पारंपरिक शेती करता करता…
Read More | पुढे वाचाCongratulation for getting bronze medal in All India Police Badminton Tournament | अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक मिळाल्या बद्दल सत्कार
आपल्या जानवली गावचे सुपुत्र राजेंद्र शंकर राणे हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून आज त्यांच्या सुप्त गुणांची एक नवीन ओळख मिळाली ती त्यांना मिळालेल्या पदकामुळे पोलिस दलात काम करत असताना अनेक समस्यांना तोंड देत आपले आवडीचे खेळ अथवा कला क्रीडा गुण जपणं तस जिकिरीचं असत. कित्येक वेळा आवड असतानाही सराव करणं देखील वेळेच्या अभावा मुळे शक्य होत नाही परंतु राजेंद्र शंकर राणे यांनी ते शक्य केलं आणि त्याच फळ त्यांना मिळालं. पोलिस कमिशनर श्री.रजनीश शेठ ह्यांच्याकडून राजेंद्र शंकर राणे जानवली (गावठणवाडी) यांना चंदीगड येथे अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य…
Read More | पुढे वाचाCashews: The Favorite Fruit from Sindhudurg, Maharashtra | काजू: सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातील आवडते फळ
शतकानुशतके काजू हे एक आवडते फळ आहे आणि त्यांचा वापर जगभरात पसरला आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक नट अथवा बी मूळचे ब्राझीलचे आहेत परंतु आता भारतासह अनेक देशांमध्ये हे पिकवले जातात. उच्च-गुणवत्तेचे काजू शोधण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यात हे ठिकठिकाणी आढळून येतात. सिंधुदुर्ग हे काजू लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, जे जगातील सर्वोत्तम काजूचे उत्पादन करतात. जिल्ह्याची सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान हे काजू पिकवण्यासाठी योग्य आहे आणि सिंधुदुर्गातील काजूच्या बागा हे पाहण्यासारखे असते. सिंधुदुर्गातील काजूची झाडे मोठी आणि सुस्थितीत आहेत आणि त्यांच्या फांद्यांना लटकलेली पिकलेली फळे…
Read More | पुढे वाचाMaharashtra State Board 12th – HSC Exam 2023 | आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा
Maharashtra State Board 12th Exam: सेंटर्सवर भरारी पथकं तसेच शेवटी 10 मिनिटांची वाढ; आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून अर्थात २१ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. यंदा कोरोना सारख्या महामारीचे सावट नसल्याने (तीव्रता फार कमी असल्याने) शिक्षणही ऑफलाईन झाले आहे त्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणार आहे आणि २१ मार्च २०२३ पर्यंत संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स त्यांच्या शाळांकडून किंवा जुनिअर/सिनिअर कॉलेजेस कडून मिळाले आहेत. कृपया विध्यार्थ्यानी हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे…
Read More | पुढे वाचाVinayaka Chaturthi 2023 | विनायक चतुर्थी २०२३
विनायक चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थ्या येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. सर्व संकट दोष-बाधा दूर करणाऱ्या श्रीगणेशाची या दिवशी पूजा केली जाते. २३ फेब्रुवारी २०२३ गुरुवार प्रारंभ तारीख – २३ फेब्रुवारी २०२३ रोजी ०३:२४ समाप्ती तारीख – २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ०१:३३ विनायक चतुर्थी दिवशी गणेश भक्त आवर्जून गणपती वाडी जानवली अथवा जानवली साटमवाडी गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन…
Read More | पुढे वाचाShri Shiv Stuti Marathi | महाशिवरात्री निमित्त श्री शिवस्तुती महादेवाचे स्मरण आवर्जून करावे
महाशिवरात्री निमित्त आज आपल्या जानवली गावाचा राजा आपले ग्रामदैवत महादेव श्री लिंगेश्वर देवाची भाविक आपल्या जानवली गावातील भक्तगण कुठे असतील तिथून देवाची आठवण करतात. देवाच्या नाम समरणात आनंद अनुभवणारे भक्तगण साता समुद्रापार देखिल आपल्या देव लिंगेश्वराची मनोमन सेवा करतात त्यांच्या करिता आपल्या देव लिंगेश्वरासाठी शिवस्तुती उपलब्ध करीत असून शिवभक्तांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. श्री शिवस्तुती Shiv Stuti Marathi कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी ।…
Read More | पुढे वाचाMajhi Malvani | माझी मालवणी
मालवणी बोलीचो गोडवो ज्याका कळलो तो मालवणीकडेच वळता मराठी भाषा वळवूची तशी वळता पण मालवणीचो ज्याका गंध आसा त्याकाच ती कळता याक मात्र खरा हा आमचो मालवणी माणूस मुळातच प्रेमळ आणि लाजाळू दुसऱ्याची भाषा मोठेपणान बोलाक जाता आणि आपली भाषा बोलाची येळ ईली की मुग गिळान गप बसता चार लोक एकठय ईले कि त्यांचा एंडुगुंडु कान लावन ऐकता मात्र भावकीतलो कोणी जवळ ईलो तर त्याका ‘काय कसं हाय’ असा देशी भाषेत ईचारता ह्या सगळा आता थांबाक व्हया मालवणी माणसानू तुम्ही मालवणीतच बोलाक व्हया आमची माय मालवणी ह्या दाखवुकच व्हया ——-…
Read More | पुढे वाचामुक्काम पोष्ट जानवली
जानवली गाव हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेले असून १२ वाड्यांचे हे गाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. जानवली गाव हे तसे कनकवली तालुक्याचा भाग असून कनकवली शहरा लगतच आहे दोघांच्या मध्ये जानवली नदी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेले शेती प्रधान तसेच पूर्वजांच्या रूढी परंपरेचा वारसा जपणारे असे हे गाव येथे येण्याची पर्यटकांना देखील भुरळ पडलीनाही तर नवलच. जानवली गाव तसे सर्व सुख सोयींनी समृद्ध असून विकासाच्या दृष्टीने देखील ग्रामस्थांची प्रयत्नांची पराकाष्टा चालूच असते. जानवली गाव हे देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांच्या आशीर्वादाने तसेच यांच्या कृपादृष्टीने सर्व स्तरावर आपला ठसा उमटवीत…
Read More | पुढे वाचा