महाशिवरात्री: शिवाची महान रात्र उत्सव | Mahashivratri: Celebrates the great night of Shiva Shankar

shri-lingeshwar-2023

महाशिवरात्री, ज्याला शिवाची महान रात्र देखील म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो दरवर्षी भगवान शिवाच्या श्रद्धेने साजरा केला जातो. भक्ती, उपवास आणि उत्सवाची रात्र म्हणून जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी हा शुभ प्रसंग अत्यंत आध्यात्मिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीची आख्यायिका: हिंदू पौराणिक कथेनुसार, महाशिवरात्री भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या लग्नाच्या वाढदिवसाचे स्मरण करते. असे मानले जाते की या रात्री भगवान शिवाने तांडव म्हणून ओळखले जाणारे सृष्टी, संरक्षण आणि विनाश यांचे दिव्य नृत्य केले. महाशिवरात्रीशी संबंधित आणखी एक आख्यायिका म्हणजे दुधाच्या समुद्राच्या मंथनाची कथा (समुद्र मंथन), ज्या दरम्यान भगवान शिवाने समुद्रातून निघालेले…

Read More | पुढे वाचा

Shri Shiv Stuti Marathi | महाशिवरात्री निमित्त श्री शिवस्तुती महादेवाचे स्मरण आवर्जून करावे

shri-lingeshwar-2023

महाशिवरात्री निमित्त आज आपल्या जानवली गावाचा राजा आपले ग्रामदैवत महादेव श्री लिंगेश्वर देवाची भाविक आपल्या जानवली गावातील भक्तगण कुठे असतील तिथून देवाची आठवण करतात. देवाच्या नाम समरणात आनंद अनुभवणारे भक्तगण साता समुद्रापार देखिल आपल्या देव लिंगेश्वराची मनोमन सेवा करतात त्यांच्या करिता आपल्या देव लिंगेश्वरासाठी शिवस्तुती उपलब्ध करीत असून शिवभक्तांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. श्री शिवस्तुती Shiv Stuti Marathi कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी ।…

Read More | पुढे वाचा

Mahashivratri 2023 Date | महाशिवरात्री २०२३: यंदाची महाशिवरात्र कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, शिवपूजनाची पद्धत.

mahashivratri

महाशिवरात्री 2023 कधी आहे: यावेळी महाशिवरात्री शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी केली जाईल. भगवान महादेव शिव शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस शिव भक्तां करिता तसेच जनमानसात देखील विशेष मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह याच दिवशी झाला होता. दर वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हिंदू संस्कृती आणि परंपरा, रूढी आणि संत महंतांच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. भगवान शंकराची कृपा आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीची चतुर्दशी तारीख…

Read More | पुढे वाचा

Temples / मंदिरे

devi-pavnai-temple

जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…

Read More | पुढे वाचा

Lingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर

lingeshwar-mandir

देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे

Read More | पुढे वाचा