Devi Bharadi Anganewadi Jatra-Yatra 2023 / २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023

Anganewadi Jatra-Yatra 2023 : माउली भराडी देवीनं कौल दिला! २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रात जत्रा किंवा यात्रा हा एक श्रद्धेचा उत्सव, असंख्य खेडोपाड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची/यंत्रांची उत्सुकता साधारण दर वर्षी पाहायला मिळते. आधिदेवता, कुलाचार, ग्रामदेवता, कुळदेवता आणि पंचक्रोशीतील देवदेवता अशा देवदेवतांच्या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच आवडीचा किंवा महत्वाचा विषय राहिलेला नसून, राज्य, देश विदेशात देखील अनेकांसाठीच हा मोठ्या श्रद्धेचा आणि रूढी परंपरेचा विषय झालेला आहे. महाराष्ट्र आणि परदेशात असणाऱ्याही सिंधुदुर्ग किंबहुना कोकणवासियांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या आई श्री भराडी देवीच्या जत्रेची यंदाची तारीख देवीच्या कौला नुसार…

Read More | पुढे वाचा

Maghi Ganesh Jayanti / माघी गणेश जयंती

ganesh-mandir-janavali

हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते, जी ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान येते. या वर्षी माघी गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ या दिवशी असून आपल्या जानवली गणपतीची वाडी येथील गणेश मंदिरात विविध कार्यक्रम, सत्यनारायण, पूजाअर्चा, प्रार्थना, आरत्या, हळदीकुंकू समारंभ यांच्या सोबत दशावतारी नाटक देखील आयोजित केले जाते. जानवली साटमवाडी येथील गणेश मंदिरात गणेश मूर्ती पूजन, मंदिर प्रदक्षिणा व महा आरती, महाप्रसाद, लहान मुलांचे विविध खेळ तसेच रात्रौ ८ नंतर सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो या दिवशी गणेश भक्त आवर्जून गणपतीच्या मंदिरात…

Read More | पुढे वाचा

Maghi Ganesh Jayanti 2023 / गणेश जयंती २०२३: गणेश जयंतीला आहेत ३ शुभ योग, जाणून घ्या कधी आहे तिथी आणि शुभ वेळ

ganesh-mandir-janavali

गणेश जयंतीचे महत्त्व : गणेश जयंती, ज्याला माघ शुक्ल गणेश जयंती असेही म्हणतात, हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा विशेष दिवस बुद्धीची देवता गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो. माघ शुक्ल गणेश जयंती याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी, माघी गणेश जयंती आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते, जी ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान येते. आम्ही शुभ प्रसंग साजरे करण्याच्या तयारीत असताना, गणेश जयंती २०२३ ची तारीख,…

Read More | पुढे वाचा

Angaraki Chaturthi / अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी

अंगारकी चतुर्थी गणपती मंदिर स्थळ गणपतीची वाडी मुक्काम पोस्ट जानवली, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील हे जागृत देवस्थान असून संकष्टी चतुर्थीला आवर्जून भक्तगण येथे येतात. सायंकाळी आरती केल्यावर प्रसाद घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन आपल्या उत्कर्षाची व यशाची प्रार्थना करतात. आज अंगारकी चतुर्थीचा या वर्षीचा एकमेव योग्य असल्याने भक्तांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. काही भक्तगण नित्यनेमाणे देवाचे खालील गणपती स्तोत्र पठण करीत असताना पहावयास मिळते: गणपती स्तोत्र संस्कृत / Ganpati stotra in Sanskrit ( संकटनाशन गणपती स्तोत्र ) प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥ प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं…

Read More | पुढे वाचा

Temples / मंदिरे

devi-pavnai-temple

जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…

Read More | पुढे वाचा